Khetwadicha Vighnaharta

अखिल खेतवाडीतील सर्वात पहिला गणपती. खेतवाडीच्या विघ्नहर्त्याची स्थापना सन १९३७ साली झाली. स्वातंत्र्यापूर्वीचा काळ ब्रिटीशांची काळी राजवट, हुकुमत व अत्याचारांचा जोश वाढत होता. ”स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच“ या ठाम मतावर असणारे लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी एकजुटीसाठी सुरु केलेला सार्वजनिक गणेशोत्सव ब्रिटीशांची देशाबाहेर हकालपट्टी करण्यासाठी व जनजागृतीसाठी मांडलेले प्रस्ताव व मते यांचे प्रोस्ताहन घेऊन खेतवाडी २रि ३रि गल्ली सन १९३७ काळातील एक शूर, हिम्मतवादी गणेशभक्त भोलाराम मारुती चोरगे यांनी गणेश भुवनच्या (जुनी डायाभाई घेलाभाई चाळ) ओट्यावर गणेश स्थापना केली. त्यांना हिम्मतीने साथ दिली ती बटर दादा, मद्रास, धर्मा आणि आकारामबुआ यांनी. हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या ह्या कार्यकर्त्यांनी मोठ्या धाडसाने गणेशोस्तव साजरा करू लागले. सन १९४२ च्या काळचा एक प्रसंग घडला तो असा …. गणेशोत्सवात श्रींच्या मूर्तीजवळ ब्रिटीश सैनिक आले आणि त्यांनी विचारले,” ये कौन है ?” आमच्या कार्यकर्त्यांनी धाडसाने उत्तर दिले – “ये हमारा भगवान है” ब्रिटीश सैनिक उर्मटपणे म्हणाले – “तुम्हारा भगवान तुम्हारे घरमे रखो, यहा नही चाहिये”…. पण ह्या कार्यकर्त्यांनी त्यांना न जुमानता गणेशोस्तव उस्ताहने साजरा केला.

 

 

SMILAR ITEMS